
वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तब्बल ११ पुस्तके लिहिणाऱ्या उबेदचा न्यु ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे झाला सत्कार
रत्नागिरी जिल्ह्यातल्या सैतावडे या छोट्याशा गावात राहणाऱ्या उमेद शेकासन या 13 वर्षाच्या मुलाने तब्बल 11 पुस्तके लिहिली आहेत. उबेदने लिहिलेल्या द मिरॅक्युलस मॅन या पुस्तकाला एका पुरस्कार ही मिळालेला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्द न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा सत्कार मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडेचे अध्यक्ष रहीम माद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेली उबेद शेकासनचे आजोबा,आजी व त्याची आई प्रामुख्याने उपस्थित होते.उबेद हा इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहे.त्याला लहानपासूनच लिखाणाची आवड निर्माण झाली.
तो सतत काही ना काही लिहिण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यातूनच त्याने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ११ पुस्तके लिहिली आहेत.त्याच्याशी बातचीत करण्याच्या प्रयत्न केला असता उबेदने सांगितले की,मी माझ्या वडीलांना आयडॉल मानतो.आणि माझे एक पुस्तक द मिरॅक्युलस मॅन हे माझ्या वडिलांवर आधारित आहे. मी याचे श्रेय पूर्ण माझ्या वडीलांना देतो की त्यांनी मला प्रेरणा दिली. सहकार्य केलं.उबेदच्या पालकांनी सांगितले की,आत्ताची मुले ही मोबाईल शिवाय राहूच शकत नाही पण उबेद हा सतत काही ना काही विचार करत असतो,लिहित असतो,
दिवसातून जेम तेम केवळ अर्धा तासच मोबाईल चा वापर करतो. ते ही त्याच्या मनाला वाटलं तर नाही तो पूर्ण पणे मोबाईल पासून लांब राहतो.या सत्कार समारंभाच्या वेळी दी. मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे या शाळेतील डॉज बाॕल संघातील मुलींचाही सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभासाठी सैतवडे गावातील दोन्ही हायस्कूलच्या मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते, व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा सत्कार समारंभ यशस्वी करण्याकरिता न्यू हिरा इंग्लिश स्कूल सैतावडे चे सचिव सादिक कपडे व या शाळेचे मुख्याध्यापक अंतुले सर याने मोठे परिश्रम घेतले.