
रत्नागिरी नगर पालिकेतील कंत्राटी लिपिकांनाही आता बायोमेट्रीकची सक्ती होणार.
रत्नागिरी नगर परिषदेत मक्त्यावर काम करणार्या सर्व लिपिकांना कार्यालयीन वेळेतच काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगर परिषदेत स्थायी लिपिकांची संख्या फारस कमी आहे. अशावेळी कार्यालयात येणार्यांची गैरसोय होवू नये यासाठी मक्त्यावरील कर्मचार्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक मशिनचा वापर केला जाणार नाही.
रत्नागिरी नगर परिषदेने स्थायी किंवा कायम स्वरूपाचे अनेक लिपिक निवृत्त झाले आहेत. सध्या केवळ सात ते आठच लिपिक कार्यरत आहेत. त्याचवेळी नगर परिषदेच्या विविध विभागात मक्त्यावरील लिपिकांची सेवा घेतली जात आहे.www.konkantoday.com