
राज्यात अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेत पहिल्याच दिवशी प्रवेशाचे संकेतस्थळ डाऊन.
गेल्याच आठवड्यात दहावी परीक्षेच्या लागलेल्या निकालानंतर राज्यात अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला बुधवार २१ मे पासून प्रत्यक्ष प्रारंभ झाला. पण सकाळी ११ वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होण्याऐवजी पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. संकेतस्थळ उघडताच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होवून अनेकांचे लॉगीन होत नाहीय, तर काही ठिकाणी भरलेली माहिती सेव्ह होत नसल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींंचा सामना करावा लागला.अकरावीच्या प्रवेशासाठी www.mahafyjcadmissions.in हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. मात्र त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शिक्षण विभागाकडून या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवेश प्रक्रिया लवरच सुरळीत होईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com