
एन एम एम एस परीक्षेत पटवर्धन हायस्कूलचे घवघवीत यश . पटवर्धन हायस्कूल मधील दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली .
इयत्ता आठवी मधील पटवर्धन हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळाले आहे. या मुलांना प्रति वर्षी बारा हजार असे 4 वर्षे म्हणजे प्रति विद्यार्थी अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे . तसेच चार विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळाली आहे, या मुलांना प्रति वर्षी नऊहजार सहाशे असे 4 वर्षे म्हणजे प्रति विद्यार्थी अडतीस हजार चारशे रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. परीक्षेस बसलेल्या मुलांना श्री दिवटे सर,श्री पालकर सर, श्री वावरे सर,श्रीम दामले मॅडम,श्री वैद्य सर , श्रीम पिलणकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले प्रशालेचे मुख्याध्यापिका सौ घाटविलकर मॅडम,उप मुख्याध्यापक श्री पंगेरकर सर , पर्यवेक्षक श्री लवंदे सर ,पर्यवेक्षिका श्रीम शिरोळकर मॅडम,श्रीम नाईक मॅडम यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त करू शकले. श्री गवाणकर सर व देवरुखर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत केली.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
1) कु.शेडेकर श्रावणी तेजसजिल्ह्यामधून खुल्या गटातून 14 वा क्रमांक.
2) कु.अल्लोळकर सानिका रुक्मान्नाजिल्ह्यामधून खुल्या गटातून 34 वा क्रमांक.
3) कु.पानवलकर अर्णव अंकुश जिल्ह्यामधून खुल्या गटातून 49 वा क्रमांक.
4) कु.सूर्यवंशी मैत्री महेशजिल्ह्यामधून खुल्या गटातून 57 वा क्रमांक.
5) कु.तोडणकर हर्षा दिवाकरजिल्ह्यामधून खुल्या गटातून 62 वा क्रमांक.
6) कु.गोरीवले तीर्था शशिकांतजिल्ह्यामधून ओबीसी गटातून 31 वा क्रमांक.
सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी नावे पुढीलप्रमाणे 👇
1) देसाई तन्मय संतोष
2) सुर्वे श्रेयसी देवेश
3) जाधव अरुंधती इंद्रनील
4) सावंत पुष्पराज संजय
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी ,पटवर्धन हायस्कूलचे पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका,पर्यवेक्षक या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.