
भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी जाहीर
संपूर्ण भारत देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषद या संघटनेची राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कमेट्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी निवडण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या आदेशाने राज्याचे उपाध्यक्ष आणि रत्नागिरीचे संपर्कप्रमुख असलम शेख यांनी या निवडी जाहीर केल्या. यावेळी इकबाल उस्मान जमादार,किशोर सखाराम साळवी,मुजीब अल्ली नाडकर,मुबशीर इकबाल जमादार,दिवाकर प्रभू, प्रवीण शिंदे,मुराद हसन अफवारे,रुपेश चव्हाण,राजू बारकू चव्हाण, दिनकर चव्हाण, प्रमोद खेडेकर यां निवडी करण्यात आल्या.