
ती’ चहाची टपरी आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर हटली.
चहा बदलून द्या म्हणून सांगितल्यावर मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ जवळ झाराप झीरो पॉईंट येथे दोरीने बांधून पुण्याच्या पर्यटकाला जबर मारहाण करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली.दरम्यान झाराप झिरो पॉईंट येथील ती टपरी आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने हटविली.
मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झाराप झीरो पॉईंट येथे महामार्ग लगत असलेल्या हॉटेलमधील मालकासह त्याच्या कुटुंबीयांनी पर्यटकाला दोरीने बांधून मारहाण केली होती. या अमानुष मारहाणी बाबत समाजातून संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान याबाबत आमदार निलेश राणे सुद्धा आक्रमक झाले. त्यांनी झाराप झिरो पॉईंट येथील पर्यटकांना मारहाण केली गेलेली अनधिकृत टपरी येत्या २४ तासात काढा. अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी ही टपरी मी स्वतः येऊन हटवणार असा इशारा आमदार राणे यांनी प्रशासनाला दिला होता.