
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ आणि २ जून रोजी वादळाची स्थिती
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या संदेशानुसार दक्षिण कोकणात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १आणि २जून रोजी वादळाची स्थिती निर्माण होणार आहे.
या दिवशी दोन्ही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किमी असण्याची शक्यता आहे.
तर १ व २ जून रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार वादळासह गारांचा व वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे आयएमडी मुंबई ने कळवले आहे.
www.konkantoday.com