
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला
देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.या भेटीमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी गेले का याचीही दबक्या आवाज चर्चा सुरू आहे.
मुंबई, पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. आजच्या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे.