
दहीहंडीचा सराव करताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका बालगोविंदाचा मृत्यू
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडीच्या सणाला मुंबईत गालबोट लागले आहे. सध्या मुंबईत गोविंद पथकांकडून दहीहंडीचा जोरदार सराव सुरु आहे.या सरावादरम्यान, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका बालगोविंदाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीडपाडा परिसरात हा प्रकार घडला. यामध्ये नवतरुण गोविंदा पथकाचा बालगोविंदा महेश रमेश जाधव (वय 11) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री अकरा वाजता दहिसरच्या केतकीपाडा परिसरात नवतरुण मंडळाकडून दहीहंडीचे थर रचण्याचा सराव सुरु होता. यावेळी या मंडळाचा बालगोविंदा महेश जाधव हा वरच्या थरावर चढला होता. तो वरच्या थरावर चढला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. तो थेट जमिनीवर कोसळल्याने त्याला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.