दीव्यांग कु.भारती भायजेला यांत्रिक व्हीलचेअर मिळाली आर एच पी फाउंडेशन चा पुढाकार : झोमटोमध्ये काम

रत्नागिरी : कु भारती गणपत भायजे रा कारवांचीवाडी रत्नागीरी यांना पाच वर्षाची असताना ताप येवुन दोन्ही पायांना पोलिओ झाला कमरेपासुन खाली संवेदना कमी झाल्या.सुरुवातीला गुडघ्यावर बसुन हात टेकवुन चालायच्या.९वी पर्यत शिक्षण घेतले.त्यानंतर चालणे अशक्य झाल्याने शिक्षण थांबवावे लागले.१० वर्षापासुन व्हीलचेअर वापरतात.सुरुवातीला कोल्हापुरच्या एका संस्थेकडुन व्हीलचेअर मिळाली होती ती वापरुन खराब झाल्यानंतर ग्रामपंचायत रत्नागीरीतर्फे एका शिबीरामधे दुसरी व्हीलचेअर मिळाली होती पण ती व्हीलचेअर सोयीची नव्हती चालवायला खुप जड जायची हात दुखायचे.भारती सध्या टेलरिंगचे काम करतात.

अाधी घरीच कपडे शिवायच्या आता कारवांचीवाडी येथे एक गाळा भाड्याने घेवुन तिथे टेलरिंग व्यवसाय करतात.घरातुन व्हीलचेअर सोयीची नसल्याने येण्याजाण्याचा खुप त्रास होत होता.एका शिबिरामधे भारती यांना आर एच पी फाउंडेशनची माहिती मिळाली त्या प्रत्यक्ष संस्थेत जावुन संस्थेचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांना भेटल्या आणी त्यांची अडचण सांगीतली सादिक नाकाडे यांनी आरएचपी फाउंडेशनतर्फे भारती यांचे नाव निओमोशनसाठी फ्रेण्ड्स फाउंडेशनला सुचविले.इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन आणी निओमोशन यांनी शिबीर घेवुन भारती यांचे चेकअप करुन त्यांची निवड निओमोशनसाठी करुन मेजरमेंट घेतले.

हॉटेल रॉयल हिल्स,वसई मुंबई येथे सात दिवसांचे निवासी ट्रेनिंग देवुन निओमोशन वितरीत करण्यात आली.निओमोशन गाडी कशी खोलायची?कशी चालवायची याविषयी सखोल माहीती ट्रेनिंगमधे देण्यात आले.भारती यांना आता कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जावुन काम करता येणार आहेत.अर्थार्जन करणेसाठीही निओमोशनचा तिला खुप उपयोग होणार आहे.तीपुर्णपणे सेल्फ डीपेंडंण्ट होणार असल्याने भारती हिला खुप आनंद होत आहे.निओमोशन ट्रेनिंगला जाणेसाठी संदीप धुमाळे यांनी भारतीला खुप मदत केली.निओमोशन भारती यांना सहज चालविता येवु लागल्याने घरापासुन दुकानापर्यत येण्याजाण्याचा खुप त्रास कमी झाला.शिलाईमशीन वर बसणे सहज शक्य झाल्याने कामाचा स्पीड वाढला. नवी उमेद उत्साह निर्माण होवुन त्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो.आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे सदस्य समीर नाकाडे यांचे भारती व तिच्या पालकांनी मनापासुन आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button