
रत्नागिरी भाजपा कार्यालय जनसेवेचे केंद्र म्हणून कार्यरत करा – आ. चंद्रकांत दादा पाटील
रत्नागिरी भाजपा कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या पूर्ततेनंतर या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील हे व्हर्चूअली उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचे कौतुक करत शानदार कार्यालयाची निर्मिती केली. आता जनसेवेसाठी हे कार्यालय कार्यरत करा, जनतेची कामे होणार केंद्र म्हणून या कार्यालयाची ओळख निर्माण करा, त्यासाठी व्यवस्था उभारा असे सांगत आगामी निवडणुकीत रत्नागिरीमध्ये भाजपाचा विजय साकार करून दाखवण्याचे आवाहन यशस्वी करा, अतिशय सुंदर कार्यालय उभे राहिले तसच सेवाकार्य करा, असे आवाहन आ. चंद्रकांत दादा पाटील प्रदेशाध्यक्ष यांनी केले.
भाजपा कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस आ. सदानंद चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आ. प्रसाद लाड यांनी अत्यंत अद्ययावत असे कार्यालय उभे राहिले आहे आता एकदिलाने पक्ष संघटना मजबूत करा, नवीन अध्यक्षांनी सुरुवातीलाच अद्यावत कार्यालय करून नवीन कार्यकारिणीच्या स्वागताची उत्तम तयारी केली आहे. आता संघटनात्मक ताकद वाढवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
याप्रसंगी बोलताना आ. रवींद्र चव्हाण यांनी नवीन अद्यावत कार्यालयाची उभारणी बद्दल अॅड. दीपक पटवर्धन व सहकारी यांचे कौतुक केले. कार्यालय जनतेच्या सेवेसाठी अखंड सुरू ठेवा. जागतं कार्यालय संघटनेची ताकद दर्शवते. रत्नागिरी दक्षिण भाजपाने लॉक डाऊन काळात उत्तम सेवा कार्य केले. संघटनेची ताकद या सेवा कार्यायातून अधोरेखित होते होत आहे. आता निवडणुका स्वबळावर लढून जिंकायच्या आहेत. त्याची तयारी या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू झाली असे समजून पक्षकार्य करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. शुभारंभाच्या छोटेखानीपणे नेटका कार्यक्रम भाजपा कार्यालयात पार पडला. अद्यावत कार्यालय नवीन केबिनमधील खुर्चीत आ. रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड, बाबा परुळेकर यांनी अॅड. दीपक पटवर्धन यांना स्थानापन्न केले. त्यानंतर उपस्थितांना पेढे वाटण्यात आले.
याप्रसंगी विक्रम जैन व संदीप (बाबू) सुर्वे यांचा कंत्राटदार म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ. रवींद्र चव्हाण व आ.प्रसाद लाड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
भाजपा चा चेहरामोहरा बदलला आहे याची साक्ष हे सुंदर कार्यालय देत आहे असे भावोद्गार याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी काढले.कै.आ कुसुमताई अभ्यंकरांच तेजपुंज व्यक्तिमत्त्वाची ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळावी व चैतन्य कायम राहावे यासाठी कार्यालयातील सभागृहाचे नाव आ.सौ कुसुमताई अभ्यंकर सभागृह असे करण्यात आले आहे. मा. प्रदेशाध्यक्षांनी अपेक्षीलेले जनसेवेचे काम या कार्यालयातून केले जाईल. सर्व कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी हे कार्यालय सदैव कटिबद्ध राहील. भाजपाचा जनाधार वाढवण्यासाठी आवश्यक ऊर्जा या कार्यालयातून कार्यकर्त्यांना मिळत राहील. सर्वांचे सहकार्य प्राप्त होऊन भाजपाचे मार्गक्रमण विजय पथाकडे राहील अशी ग्वाही अॅड. पटवर्धन यांनी दिली. या कार्यक्रमादरम्यान प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणीक यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अॅड. बाबा परुळेकर,श्री. अशोक मयेकर श्री.सचिन वहाळकर, श्री.राजेश सावंत, श्री. यशवंत वाकडे, श्री. सचिन करमरकर, देवरुख नगराध्यक्ष मृणाल शेटे,सौ. राजश्री शिवलकर, श्री. प्रवीण देसाई, श्री. प्रमोद अधटराव मुन्ना चवंडे, भाजपा नगरसेवक तसेच अॅड. पाटणे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.