
वडिलोपार्जित मालमत्तेसाठी विवाहित महिलेला मारहाण करून छळ, पती, सासरा, सासू आणि नणंद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
वडिलोपार्जित मालमत्तेसाठी दापोली शहरातील एका विवाहितेला सासरची मंडळी त्रास देवून मारहाण करत असल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पती, सासरा, सासू आणि नणंद अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहितेचा पती, तिला कसल्या तरी औषधाच्या गोळ्या जबरदस्तीने खाण्यास देत असे. यामुळे तिला गुंगी यायची. अशा परिस्थितीत तिला धमकी देवून तिच्या वडिलांनी मिळवलेल्या मालमत्तेचे खरेदीखत केले गेले.
सही न केल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच सहीला विरोध केल्यास चटके देवून मारण्याचाही प्रयत्न झाला. याबाबत माहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडे वाच्यता न करण्याची धमकी देण्यात आल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार पती, सासरा, सासू व नणंद यांच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.www.konkantoday.com