
बेकायदा मच्छिमारीप्रकरणी मत्स्य विभागाकडून १६ नौकांवर कारवाई तर ४ नौकांना लाखोंचा दंड.
अनधिकृतरित्या मच्छिमारी करणार्या नौकांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये आतापर्यंत १६ नौकांवर कारवाई झाली असून त्यापैकी ४ नौकांना ४ लाख ८० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकृत सूत्रांनी माहिती दिली की, रत्नागिरी परिसरात अनधिकृत मासेमारी करताना आतापर्यंत १६ नौकांवर कारवाई झाली आहे. त्या नौका बेकायदेशीर मच्छिमारी करताना आढळून आल्या.www.konkantoday.com