
प्रयागराजपुन्हा जाम; रस्त्यावर अडकले लोकं; रेल्वेही रद्द, लहान,वृद्ध सर्वांचीच अन्न-पाण्यासाठी वणवण
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात भारतातून लोक येत आहेत. महाकुंभात स्नान करण्यासाठी रोज लाखो लोकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे तुफान गर्दी तर आहेच पण सोबतच अनेक दुर्घटनाही घडाताना दिसत आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये वाहतूककोंडी होऊन तब्बल 18-19 तासांपासून लोकं त्या ट्राफिकमध्ये अडकले होते. यावेळी या वाहतुक कोंडीतून सुटण्यासाठी लोकांनी मदतसाठी विनंती केली होती. सर्वा भाविकांना अक्षरश: तसंच अडकून पडण्याची वेळ आली होती.मात्र आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडींचं भिषण चित्र पाहायला मिळत आहे.
महाकुंभमेळ्यादरम्यान, प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी आहे. रस्त्यांवर लोकांची आणि वाहनांची तुफान गर्दी दिसत आहे. लोकं भुकेले आणि तहानलेले आहेत.प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गर्दी कमी झाल्याचे वृत्त होतं, तर आखाड्यांचे साधू आणि संतही परतीच्या प्रवासाला निघाल्याचं म्हटलं जात होतं. या बातम्यांनंतर, पुन्हा एकदा लाखो भाविक महाकुंभात पोहोचल्याचं चित्र समोर आलं.प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे स्टेशनचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जे लोकं आत अडकले होते ते आतच राहिले. रेल्वे स्टेशनवरून मोठ्या संख्येनं गर्दी रेल्वे रुळावरून पुढे जाताना दिसत आहे.
प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी असल्याचं म्हटलं जात आहे. परिस्थिती अशी आहे की लहान मुले, मोठे, वृद्ध आणि इतर भाविक वाहतूक कोंडीत अडकले असून ते अन्न आणि पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. यावर सपाचे सुप्रीमो अखिलेश यादव यांनीही ट्विट करून लोकांसाठी तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, महाकुंभात सर्वत्र भुकेले, तहानलेले, त्रासलेले आणि थकलेले यात्रेकरू आहेत. त्यांनी राज्य सरकारला मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहण्याचे आणि तातडीने व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.