
कै .आरती अरविंद साळवी स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्यचे वाटप
कै आरती अरविंद साळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जीवन विद्या मंडळ कसोप -फणसोप (मुंबई )संचलित कै आरती अरविंद साळवी पूर्व प्राथमिक विद्यामंदिर कसोप फणसोप येथे शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. कमलाकर साळवी, उपाध्यक्ष मा .मनिष साळवी मुख्याध्यापक सौ .नेत्रा राजेशिर्के प्रशांत साळवी, मकरंद साळवी, अवधूत साळवी, अलंकार साळवी सौ निलिमा साळवी श्री गंगाराम गवाणकर सर सौ स्नेहल साळवी सौ समृद्धी साळवी सौ गवाणकर मॅडम विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग उपस्थित होते.
प्रथम कार्यक्रमाची सुरुवात कै आरती साळवी यांच्या प्रतिमेला हार व पुष्पांजली वाहून करण्यात आली. यावेळी प्रा सुशील साळवी यांनी कै आरती अरविंद साळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व जीवनकार्याविषयी विद्यार्थीना माहिती दिली यावेळी श्री गवाणकर सर, संस्थेचे अध्यक्ष मा. कमलाकर साळवी यांनी जयेश साळवी यांचे आभार व्यक्त केले. तसेच दरवर्षी हा दिवस आपण कै आरती अरविंद साळवी स्मृतिदिन साजरा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ स्नेहल साळवी यांनी व्यक्त केले