
ऑपरेशन टायगर. 100 टक्के कोकण खाली होणार-मंत्री गुलाबराव पाटील.
सगळीकडे ऑपरेशन टायगर यशस्वी व्हायला लागलं आहे. त्यामुळे १०० टक्के कोकण खाली होणार आहे’, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे.पुढे ते असेही म्हणाले की, नांदेडमध्ये बऱ्याच लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि बऱ्याच जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर बघायला मिळणार असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. कारण खरी शिवसेना कोणाची हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे खरे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत असल्याची माहितीही गुलाबराव पाटील यांनी दिली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शाह हेच एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राऊत यांचं ऑपरेशन कसं होईल हे त्यालाच माहिती आहे’, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी एकेरी उल्लेख करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणि काँग्रेसचे काही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू होती. यामध्ये रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि रमाकांत म्हात्रे हे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासोबत सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.