
आंगणेवाडी जत्रेसाठी येणार्या चाकरमान्यांसाठी परतीसाठी धावणार सावंतवाडी-एलटीटी स्पेशल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी भराडी देवी जत्रेच्या पार्श्वभूमीवर २१ व २२ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वे प्रशासनाने दोन स्पेशलच्या फेर्या जाहीर केलेल्या असतानाच भाविकांच्या परतीसाठीही सावंतवाडी-एलटीटी स्पेशल धावणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले. या स्पेशलचे आरक्षण ९ फेब्रुवारी रोजी खुले होणार आहे.०११३४/०११३३ क्रमांकाची सावंतवाडी-एलटीटी स्पेशल २३ फेब्रुवारी रोजी धावेल. सावंतवाडी येथून सायंकाळी ६ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता एलटीटीला पोहचेल.
परतीच्या प्रवासात २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता एलटीटी सुटून त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथे पोहचेल.२० एलएचबी डब्यांची स्पेशल कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, पिलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगांव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे स्थानकात थांबे आहेत. परतीसाठी जाहीर झालेल्या स्पेशलमुळे आंगणेवाडी जत्रेसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com