
अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा मोर्चा काढू.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात वापरलेल्या अपशब्दावरून चिपळूणवासीय आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात गुरूवारी ठाकरे शिवसेनेने तर शुक्रवारी मराठा क्रांती प्रतिष्ठान व मराठा समाजाच्यावतीने तसेच दसपटी मराठा सेवा संघातर्फे तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन देत येत्या पंधरा दिवसात सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर प्रचंड मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी मराठा क्रांती प्रतिष्ठानच्यावतीने तहसीलदार प्रवीण लोकरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी औटी, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना निवेदनासह तक्रारही देण्यात आली.www.konkantoday.comc. aw