
दुसऱ्याच्या नावाने बनावट पासपोर्ट तयार करून दहा वर्षे लंडन ते भारत प्रवास,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
दुसऱ्याच्या नावाने बनावट पासपोर्ट तयार करून करून गेली दहा वर्ष या बनावट पासपोर्ट द्वारे लंडन ते भारत असं वास्तव्य करणाऱ्या दापोलीतील सदानंद गणपत चाफे राहणार चिखलगाव तालुका दापोली याच्यावर दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूतनीकरण करण्यासाठी पासपोर्ट पोलिस चौकशीला आला होता.
पोलिसांनी चौकशी केल्यावर कागदपत्रावर सुधीर गुणाजी चापेकर असे नाव होते प्रत्यक्षातआरोपीचे नाव सदानंद गणपत चाफे असतानादेखील त्याने वरील बनावट नावाचा वापर केला
जवळजवळ दहा वर्षे या नावाने भारत ते लंडन असा प्रवास करून तिथे वास्तव्य राहिल्यावर आता हा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com