
महाराष्ट्र राज्य कलाकार विभाग कला प्रदर्शनात सह्याद्री संस्थेच्या दोन माजी विद्यार्थ्यांना पुरस्कार.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कला, संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईच्यावतीने ६४ वे महाराष्ट्र राज्य कलाकार विभाग कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे सुरू झघले आहे. यामध्ये सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी राकेश देवरूखकर, संदेश मोरे यांच्या कलाकृतींना पुरस्कार मिळाला आहे. तर अन्य ६ जणांची चित्रे या प्रदर्शनात झळकत आहेत.
या प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नुकतेच झाले असून ते १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी राज्यातून ७८० कलाकृती आल्या होत्या. त्यातील १४८ कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. या सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी राकेश देवरूकर, विक्रांत बोथरे, संदेश मोरे, मकरंद राणे, कौस्तुभ सुतार, किरण शिगवण, शुभम बाडये, नितीश प्रभुळकर यांच्या कलाकृतींची निवड करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनात झळकत आहेत.www.konkantoday.com