
तरूण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकूर यांना गुरू महात्म्य पुरस्कार जाहीर.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर टस्टतर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा गुरू महात्म्य पुरस्कार यंदा तरूण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाकूर यांच्यासोबत विज्ञाननिष्ठ अध्यात्माचे प्रणेते अभिजित पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.www.konkantoday.com