
योगेश पवार कुटुंबियांनी आईचा प्रथम स्मृती दिन आगळ्या पद्धतीने साजरा केला
_रत्नागिरीतील योगेश उत्तमा देऊ पवार कोकण रेल्वे चे कर्मचारी तसेच मूळचे असुर्डे गावचे रहिवासी ह्यांच्या आईचा प्रथम स्मृतिदिन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिनांक ३० जुलै 2024 रोजी असुर्डे तालुका चिपळूण येथे पार पडला ह्यावेळी पवार कुटुंबातील सदस्यनी गावातील एस एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तसेच स्मृती चिन्ह व आर्थिक मदत केली ह्या वेळी कडवई तालुका संगमेश्वर येथील शिक्षक श्री मिलींद कडवईकर सर व त्यांचे सहकारी कडवई येथे व्यायाम शाळा चालवतात त्यांच्या संस्थेचा सुध्दा स्मृतिचिन्ह व आर्थिक मदत देवून गौरव केला ह्यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री रवींद्र खानविलकर बँक ऑफ इंडिया चे निवृत्त अधिकारी श्री शांताराम भुरवणे श्री विलास डिके मुंबई महानगरपालिका चे निवृत्त अधिकारी श्री संजय जाधव असुर्डे गावचे उपसरपंच श्री दिलीप जाधव श्री कुशिवडे गावचे रहिवासी बौद्धचारी श्री कदम गुरुजी सुध्दा हजर होते ह्या वेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना खूप सुंदर मार्गदर्शन केले ह्या वेळी असुर्डे बौद्धवाडीतील शिक्षिका सौ कवीतके ह्या सुध्दा आपल्या विद्यार्थ्यांना घेवून उपस्थित होत्या