ऑनलाईन वीजबिल भरा व महावितरणकडून बक्षिसे मिळवा

महावितरणने ऑनलाईन वीजबिल भरणार्‍या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब (एलटी लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असेल. ज्यानी १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१०४२०२३ ते ३१०३२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button