
आता चिपळुणात देखील स्थानिकांपेक्षा परप्रांतीय भिकार्यांची संख्या वाढली.
गेल्या वर्षभरापासून चिपळूण शहरात परप्रांतीय भिकार्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हॉटेल, बेकर्यांसमोर मुले व त्यांचे पालक भीक मागण्याचे काम करीत आहेत. यातील काही भिकारी पैशांसाठी बाजारात खरेदीला आलेल्या महिलांचा पाठलाग करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नगर परिषद, पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देवून या भिकार्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे लोकसंख्याही त्याच पटीत वाढत आहे. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये झोपड्याही वाढत असून काही झोपड्या परप्रांतीय मजुरांच्या असल्या तरी काही झोपड्यांमध्ये राहणार्या व्यक्ती व त्यांची मुले शहरात दिवस-रात्र भीक मागण्याचे काम करीत आहेत. ५० हून अधिक भिकार्यांचा शहरात वावर असून यात लहान मुलांसह त्यांचे पालक व वयोवृद्धांचा समावे आहे. या सर्वांनी मोठी हॉटेल, बेकर्या परिसरात कब्जा मिळवला असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते तेथेच बसून भीक मागण्याचे काम करीत आहेत.www.konkantoday.com