
मोटारसायकलची चावी दिली नाही म्हणून चाकुने वार केले ,१जण जखमी
बाहेर जाण्यासाठी मोटारसायकलची चावी मागितली परंतु ती दिली नाही या रागाने चिपळूण दादर देऊळवाडी येथील प्रवीण चव्हाण यांच्यावर चाकूने वार केल्याप्रकरणीत्याचा भाऊ सागर चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा
हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादी प्रवीण हा आपल्या घरात असताना त्याचा भाऊ आरोपी सागर हा दारू पिऊन घरी आला व मोटारसायकलची चावी मागू लागला परंतु प्रवीण याने पेट्रोल पंप बंद असल्याने गाडीमध्ये पेट्रोल नसल्याचे सांगितले यांच्या राग आरोपीला येऊन शिवीगाळ करत त्याने खिशातील चाकूने फिर्यादीच्या मानेवर वार करून त्यांना जखमी केलेजखमी झालेल्या प्रवीण याला सुरुवातीला कामथे हॉस्पिटल येथे त्यानंतर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com