
GBS ची झाली मुंबईत एन्ट्री ! अंधेरीत आढळला पहिला रुग्ण
जीबीएस सिंड्रोमने पुण्यात धुमाकूळ घातलाच आहे, त्याचबरोबर आता या सिंड्रोमने मुंबईत देखील शिरकाव केल्याची घटना समोर आली आहे. जीबीएस सिंड्रोमचा पहिला रुग्ण मुंबईत आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.पुण्यातील जीबीएस सिंड्रोम आजाराचा वेगाने प्रसार होत आहे. आतापर्यंत एकही रुग्ण मुंबई आढळला नव्हता, पण आता एक रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
या जीबीएस सिंड्रोमने पुण्यात धुमाकूळ घातलाच आहे, त्याचबरोबर आता या सिंड्रोमने मुंबईत देखील शिरकाव केल्याची घटना समोर आली आहे. जीबीएस सिंड्रोमचा पहिला रुग्ण मुंबईत आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पुण्यातील जीबीएस सिंड्रोम आजाराचा वेगाने प्रसार होत आहे. आतापर्यंत एकही रुग्ण मुंबई आढळला नव्हता, पण आता एक रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली आहे. त्याचबरोबर या रूग्णाच्या कुटूंबियांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना दिली आहे. शिवाय या रुग्णावर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील मुरजी पटेल यांनी केल्या आहेत.