
विकास योजना आराखडयाची पूर्वतयारी, देवरूख शहराचे जमीन वापर नकाशे तयार.
सध्याच्या देवरूख शहरातील जमीन वापरासंदर्भात आवश्यक त्या नोंदी आणि नकाशे तयार करण्यात आले आहेत. भविष्यातील विकास योजना आराखडयाची ही पूर्वतयारी आहे. सध्या या संदर्भात सर्व भागधारकांची बैठक घेवून त्यांना कल्पना देण्यात आली आहे आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगर विकास विभागाच्या सहाय्यक संचालक स्मिता कळकुटकी यांनी दिली.
त्या म्हणाल्या, देवरूख शहराचा विकास आराखडा बनवण्याची व्यापक योजना आहे. या योजनेसाठी सध्याच्या जमीन वापरासंदर्भात नोंदी व नकाशे तयार करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण झाले आहे.www.konkantoday.commm