
रत्नागिरी जिल्ह्यात १२ हजार ८८५ स्मार्ट वीजमीटर
महाराष्ट्रात वीज पुरवठा करणार्या महावितरण कंपनीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टी.ओ.डी. (टाईम ऑफ डे) स्मार्ट वीज मीटर वीज ग्राहकांच्या घरात लावले जाणार आहेत. टीओडी मीटर हे ग्राहकांना मोफत मिळणार असून यासाठी प्रीपेड चार्जिंग करावे लागणार नाही. या मीटरमुळे वीज दरात सवलत मिळणार असून सध्या सुरू असलेल्या प्रणालीत कोणताही बदल होणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १२ हजार ८८५ टी.ओ.डी. वीजमीटर बसवण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात वीज परिमंडळात ट्रान्सफॉर्मर आणि वीज केंद्रात उच्चदाब वीज वाहिन्यांसोबत जुळलेल्या ठिकाणात या नव्या तंत्रज्ञानाचे डिजिटल मीटर लावण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात महावितरणचे एकूण सुमारे ६ लाख वीज ग्राहक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात फीडर उपकेंद्र असलेल्या ३३० पैकी २५९ ठिकाणी टीओडी वीजमीटर बसविण्यात आले आहेत. ट्रान्सफॉर्मर ८८५६ पैकी १६५१ ठिकाणी, शासकीय कार्यालये असलेल्या १२,२४८ पैकी ४२०५ ठिकाणी नादुरूस्त असलेले ४,३८८ वीजमीटरच्या ठिकाणी टीओडी वीजमीटर लावण्ययात आले आहेत. तसेच नव्याने कनेक्शन घेतलेल्या १ हजार ३१६ ग्राहकांना वीजमीटर देण्यात आले आहेत.www.konkantoday.com