
राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचं व्हिडिओ कॉल करून अभिनंदन केलं
उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण आणि नारळ फेकणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी व्हिडीओ कॉल करून संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर मनसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.दरम्यान या सर्वप्रकारामुळे आता ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे हे आज ठाण्यात येऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.