
महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूची चोरी, बांधकाम व्यावसायिकांना ६ लाखांचा दंड
खेड महसूल विभागाने जप्त करून ठेवलेल्या अनधिकृत वाळूची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी खेड येथील बांधकाम व्यावसायिकाला ६ लाख ८ हजार रुपयांची दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यातील यावा परिसरातील अवैध वाळू उत्खनन करून ती गावठाण चंडिका मंदिराजवळ साठा करून ठेवली होती. याबाबत महसूल विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जावून वाळूचा पंचनामा करून ही वाळू जप्त केली होती. मात्र एप्रिल महिन्याच्या शेवटी ही वाळू एका बांधकाम व्यावसायिकाने जेसीबीमधून भरून नेली. सदरचा बांधकाम व्यावसायिक हा शासकीय इमारतीचे काम करीत होता, त्यामुळे त्याला या वाळूपैकी जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने काही ठराविक वाळू नेण्यास सांगण्यात आली होती. मात्र सदरच्या बांधकाम व्यावसायिकाने चार डंपरचा वापर करून सर्वच्या सर्व २० ब्रास वाळू उचलून नेली म्हणून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
www.konkantoday.com