![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/02/download-14.jpeg)
हर्णै येथील मच्छिमार बांधवांचे ४० वर्षाचे स्वप्न होणार पूर्ण, हर्णै जेटीच्या बांधकामाला सुरूवात.
अनेक वर्षे प्रलंबित असलेला हर्णे जेटीचा विषय मार्गी लागला असून नुकताच जेटीच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. यामुळे हर्णै बंदरातील मच्छिमारांमधून समाधान व्यक्त होत आहे.बहुप्रतीक्षेनंतर हर्णै बंदरातील जेट्टीच्या कामाला अखेर सुरूवात झाली असून कनकदुर्ग किल्ल्याच्या बाजूने काम सुरू केले आहे. गेले ४० वर्षापूर्वी मंजूर झालेले हर्णै जेटीचे काम लाल फितीत अडकले होते.
यासाठी स्थानिक तसेच जिल्हाभरातील मच्छिमार बांधवांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. मात्र गेली अनेक वर्षे त्यांच्या या लढ्याला यश येत नव्हते. अखेर दापोलीचे तत्कालीन आमदार व विद्यमान गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम व खा. सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यानंतर या कामाला गती प्राप्त झाली.www.konkantoday.com