रत्नागिरी शहरा नजीक नाचणे गुरुमळीतील मोरीचे काम अपूर्ण.
रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे-गुरुमळीवाडीकडे जाणार्या रस्त्यावर मोरी बांधण्यासाठी मागील महिनाभर रस्ता खणण्यात आला असून, मोरी बांधण्याचे काम बंद असल्याने रात्रीच्यावेळी पादचारी ग्रामस्थ व दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण झाले आहेत्यातच एसटी बस बंद झाल्यामुळे शाळकरी मुलांचेही हाल होत असून, हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी गुरुमळीवासीयांनी केली आहे.नाचणे गोडावून स्टॉप येथून गुरुमळीत जाणार्या रस्त्यावर बाणेवाडीच्या पुढे असणार्या छोट्या नाल्यावर मोरी बांधण्याचे हाती घेण्यात आले आहे.
नाल्यामध्ये गाळ भरल्यामुळे पहिली मोरीही गाळाने भरल्याने, मोठया पावसात रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे मोरीची उंची वाढवून नव्याने काम होणार आहे. मागील महिनाभरापासून पहिली मोरी खणून काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी आंबाबागेमधून तात्पुरता छोटा रस्ता उभारण्यात आला असून, त्यातून दुचाकी व तीनचाकी वाहनेचजात आहेत. जुनी मोरी खणल्यामुळे गुरुमळीत जाणारी एसटी सेवा बंद झाली आहे. गॅस वाहतूकही बंद असल्याने सिलेंडरसाठी ग्रामस्थांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.