![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/01/download-11-15.jpeg)
रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी येथील रेल्वे ट्रॅकवर रेल्वे खाली उडी घेत रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या
रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी येथील रेल्वे ट्रॅकवर रेल्वे खाली उडी घेत रेल्वे कर्मचाऱ्यानेच आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 4 फेब्रुवारी रोजी रात्री 12.20 वा. पूर्वी घडली आहे.संदीप तानाजी लोंढे (40,रा.कोकण रेल्वे कॉलनी सावित्री बिल्डींग,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत रेल्वे सुरक्षा बल म्हणून नोकरीला असलेले प्रफुल्ल मधुकर पवार (40) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार,मंगळवारी रात्री ते बंदोबस्त ड्युटी करत होते. त्यावेळी रात्री 12.20 वा. सुमारास ऑन ड्युटी स्टेशन मास्तरांनी त्यांना फोन करुन माहिती दिली कि, किलोमिटर 205/2 येथे एक इसम रेल्वे खाली येउन मयत झालेला आहे. या माहितीवरुन खबर देणार प्रफुल्ल पवार हे स्टाफ सोबत खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांना एक मृतदेह टॅ्रकच्या बाहेरील मृतदेह,आढळला बाजुला एक मोबाईल आणि पॅटच्या खिशात वेगवेगळ्या बँकांचे व पतसंस्थांची पासबुक मिळून आली. त्यातील एका पासबुकवर त्याचा फोटो मिळून आला. व पासबुकवर त्याचे नाव संदीप लोंढे असे समजून आले.
याबाबत त्यांनी ग्रामीण पोलिसांनी माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.