मोबाईल चोरीप्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये सुरुबन येथे तरुणाच्या मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
अमान इमान हुसेन मुल्ला (२४) व अशर्द राशिद खान (२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी इंझमाम अस्लम काझी (२१) यांनी तक्रार दाखल केली होती.