मुरूड व दाभोळ किनारपट्टीवर आढळलेले तरंगणारे दगड आढळल्याने कुतूहल वाढले
दापोली तालुक्यातील मुरूड आणि दाभोळ या किनारपट्टी प्रदेशांमध्ये तरंगणारे दगड सापडल्यामुळे येथील नारिकांमधून त्याबाबत कुतूहल निर्माण झाले.या तरंगणार्या दगडांना प्युमिस दगड असे म्हटले जाते. जीवंत ज्वालामुखीच्या समुद्राच्या तळाशी झालेल्या उद्रेकातून अशा दगडांची निर्मिती होत असल्याची माहिती शास्त्रसाने प्रसिद्ध केली आहे. जगाच्या अनेक प्रदेशांमध्ये समुद्रकिनारी अशा प्रकारचा प्युमिस अर्थात तरंगणारा दगड आढळून येतो. यामध्ये इंडोनेशिया, जपान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, सीरीया, इराण, यशिया, तुर्कस्तान, ग्रीस, इटली, हंगेरी, जर्मनी, आईसलँड, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, केनिया इथिओपिया, तांजानिया अशा अनेक देशांमध्ये हा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. तो दगड तरंगणारा असल्याने समुद्राच्या पाण्यातील प्रवाहामुळे तो पाण्यातून अनेक किलोमीटर दूरपर्यंत वाहत जातो. या दगडामध्ये काही प्रमाणात औषधी द्रव्यही आढळून येत असल्यामुळे चीनसारख्या देशात हजारो वर्ष त्याचा औषधी म्हणून वापर होत आहे.आंघोळ करताना अंग घासण्यासाठीही अशा दगडांचा पूर्वी वापर केला जात होता. कोकणातल्या किनारपट्टीवर मात्र तो अभावानेच आढळून आला असल्यामुळे याबाबत येथील ग्रामस्थांना त्याचे कुतूहल वाटत आहे.www.konkantoday.com