![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/02/download-16.jpeg)
दुर्गम भागात नजिकच्या सरकारी गोदामातून रास्त धान्याचे वितरण होणार.
दुर्गम क्षेत्रातील रास्त धान्य दुकानात धान्य वितरणाच्या अनेक अडचणी येत असतात. या अडचणी दूर करण्यासाठी नजिकच्या गोदामातून धान्य पुरवठा करावा, त्यासाठी तालुका, जिल्हा यांची बंधने दूर ठेवावीत, असा विचार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
तालुक्याच्या सीमेवरील गावांमध्ये दुसर्या तालुक्यातील धान्य गोदाम नजिकचे असले तरी तेथून धान्य आणता येत नव्हते. यापुढे नजिकच्या सरकारी गोदामातून धान्य, रास्त दराच्या धान्य दुकानदारांना पोहोचवावे, यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात यावी, यासाठीचे सर्व पुरवठा अधिकार्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत.www.konkantoday.com