चिपळूण नगरपालिका राजकीय नेत्यांची व विनापरवाना बॅनर लावणार्यांची झोप उडवणार
एक अशी बातमी की ज्यामुळे राजकीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची झोप उडणार आहे. चिपळूण शहरामध्ये शुभेच्छा किंवा जाहिरातेचे जे बॅनर लावले जातात ते आता इथून पुढे विनापरवाना लावता येणार नाहीत. पीआयएल १५५ नुसार न्यायालयाने नगरपालिकांना कठोर निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार विनापरवाना बॅनर लावल्यास बॅनर लावणार्यावर किंवा बॅनरवर ज्यांचा फोटो आहे अशा व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भातील एक महत्वाची बैठक नुकतीच चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घेतली.
काही लोकप्रतिनिधी आणि बॅनर प्रिंटींगमध्ये व्यावसायिक या बैठकीला उपस्थित होते. शासकीय जागा किंवा खाजगी जागा या ठिकाणी बॅनर लावायचा असल्यास जागा मालकाच्या संमत्तीशिवाय चिपळूण नगर पालिकेची परवानगी काढून मिळालेला क्यूआरकोड जर बॅनरवर नसेल तर थेट गुन्हा दाखल करा, अशा सूचना न्यायालयातर्फे जारी झालेल्या आहेत. त्यामुळे आता वाढदिवस, उत्सव किंवा इतर कमर्शियल जाहिरातींचे बॅनर विनापरवाना झळकल्यास थेट गुन्हा दाखल होवून तुमच्यावर कारवाई होवू शकते, असे बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीला मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले, पोलीस उपनिरीक्षक आढाव, कार्यालयीन अधीक्षक राहित खाडे, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर, मालमत्ता विभाग प्रमुख सागर शेडगे आदी उपस्थित होते.www.konkantoday.com