![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/02/download-11.jpeg)
खेड तालुक्यातील १७ गावांचा व ४४ वाड्यांचा पाणीटंचाई आराखड्यात समावेश.
खेड तालुक्यात यंदा १७ गावे ४४ वाड्या पाणीटंचाई आराखडयात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सोमवारी भरणे येथील श्री काळकाई मंदिर सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आराखडा आढावा बैठकीस गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत सर्वच अधिकार्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या. या बैठकीस आमदार भास्कर जाधव अनुपस्थित राहिले. दोन तासातच पाणीटंचाई आढावा बैठक आटोपती घेण्यात आली.
तालुक्याला दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करून पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत टंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या गाव-वाड्यांची माहिती देण्यात आली.www.konkantoday.com