आरोग्य उपकेंद्रांना स्वतःची जागा द्या, मनसे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांची मागणी
रत्नागिरीतील ग्रामीण भागात भाड्यांच्या जागेतून आरोग्य सेवा पुरविणार्या आरोग्य उपकेंद्रांना मालकी हक्काच्या जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांच्याकडे केली आहे.
उपकेंद्राना स्वतःच्या हक्काची जागा नसल्याने भाड्याच्या जागेतून सेवा द्यावी लागत आहे. शासनाकडून एकूण मंजूर ३७८ पैकी २१८ उपकेंद्राच्या हक्कांच्या इमारती आहेत. त्यातील १०१ इमारतींसाठी अजूनही हक्काची जमीन मिळालेली नाही तर काही उपकेंद्रे निर्माणाधीन आहेत.
www.konkantoday.com