शिवशाही बसेस मुळे रत्नागिरी विभागाला गेल्या पाच वर्षांमध्ये साडेपाच कोटींचा तोटा
राज्य मार्ग परिवहन एसटीकडे प्रवासी आकर्षित करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात पाच वर्षांपूर्वी आलिशान शिवशाही गाड्या आल्या.रत्नागिरी विभागाला त्यातील ३४ गाड्या मिळाल्या. वातानुकूलित, आरामदायी गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी महामंडळाची धारणा होती; परंतु शिवशाही बस म्हणजे पांढरा हत्ती पोसल्यासारखे झाले आहे.
शिवशाहीला प्रत्येक किमीला ५० रुपये उत्पन्न आहे, तर ७२ रुपये खर्च आहे. प्रत्येक किमीला २२ रुपयाचा तोटा या गाडीमुळे एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे. दिवसाला शिवशाही ५०० किमी फिरते. ३४ गाड्यांचा महिन्याचा तोटा काढला तर १ कोटी १२ लाखांवर जातो. त्यामुळे शिवशाही बस महामंडळाला सावरणारी नाही तर आर्थिक खड्ड्यात घालणारी ठरत आहे.आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळ कोरोना महामारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुन्हा आर्थिक खाईत लोटले गेले. काळानुरूप एसटी महामंडळाने कात टाकण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांच्या मूलभूत गरजांचा विचार करून एसटीने खासगी आरामदायी गाड्यांशी स्पर्धा सुरू केली२०१९-२०च्या दरम्यान महामंडळामध्ये आलिशान शिवशाही गाडी आली.रत्नागिरी विभागाच्या वाट्याला यातील ३४ शिवशाही आल्या. पाच वर्षे झाली. या गाड्या अजूनही सुस्थितीत आहेत; परंतु साध्या गाड्या आणि शिवशाही गाड्यांमध्ये मोठा फरक आहे. या गाड्या सेन्सरवर चालतात. सेन्सर खराब झाला तर गाडी बंद पडली. वातानुकूलित यंत्रणेचे स्वतंत्र काम करून घ्यावे लागते. उर्वरित काम करताना साध्या गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांचे सुट्टे भाग (स्पेअर पार्ट) महागडे आहेत. प्रत्येक किमीला या गाडीचे उत्पन्न ५० रुपये आहे; परंतु खर्च ७२ रुपये आहे. शिवशाहीच्या प्रत्येक किमीला एसटीला २२ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. वर्षाला सुमारे १ कोटी १२ लाख म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये साडेपाच कोटींचा तोटा शिवशाहीमुळे महामंडळाला सहन करावा लागला आहे.