वाशी मार्केटमध्ये मंगळवारी कोकणातून हापूसच्या १०० पेट्या दाखल
वाशी मार्केटमध्ये मंगळवारी कोकणातून हापूसच्या १०० पेट्या दाखल झाल्या आहेत.गेल्या तीन दिवसांत ३२५ आंबा पेट्या आल्या असून, यातील ९५ टक्के देवगडमधील, तर पाच टक्के रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.
वाशी मार्केटमध्ये १ फेब्रुवारी रोजी १७५ आंबा पेट्या विक्रीला आल्या होत्या. रविवारी मार्केटला सुट्टी असल्याने विक्रीसाठी आंबा आला नाही. त्यानंतर, सोमवारी ५० पेट्या, मंगळवारी १०० पेट्या विक्रीसाठी आल्या.