राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मल्लखांब संघ सज्ज, डेरवण येथे सराव सुरू.

३८ वी राष्ट्रीय मल्लखांब क्रीडा स्पर्धा यंदा ११ फेब्रुवारीपासून उत्तराखंड येथे होत आहे. या पाश्‍वभूमीवर महाराष्ट्र संघातील सहा मुले व मुली यांचे सराव प्रशिक्षण शिबिर डेरवण येथे एसव्हीजेसाठी क्रीडा संकुलात सध्या सुरू आहे. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या विद्यमान महाराष्ट्र हौशी संघटना, चिपळूणच्यावतीने हे शिबिर होत असून महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू कसून सराव करीत आहेत.

चिपळूण येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते शांताराम जोशी, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तथा बाबू तांबे, रणवीर सावंत यांचे या सराव शिबिरासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य लाभत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button