राजापूर शहरातील वरचीपेठ येथील श्री. महापुरुष देवस्थान येथे श्री. गणेश मूर्तिकार संघ, राजापूर ह्यांच्या वतीने आयोजित माघी गणेश जयंती उत्सवास राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी श्री. गणेश मूर्तिकार संघाच्या वतीने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांना निवेदन देण्यात आले.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी श्री. गणेश मूर्तिकार संघाच्या निवेदन घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतली त्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणपूरक श्री गणेशाच्या शाडू मातीच्या मुर्त्या बनवत असताना दर वर्षी होणारी मातीच्या दरात होणारी वाढ त्यामुळे मुर्तीकाराना शाडू मातीच्या मुर्त्या बनवणे परवडत नसल्यामुळे नाईलाजस्तव प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मूर्त्या बनवाव्या लागत असून या बाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत प्रमुख मागणी मूर्तिकार संघाने केली. सर्व चर्चाकरून झाल्यानंतर तात्काळ राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी आपल्या एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ह्या कार्यशैलीनुसार तात्काळ पर्यावरणपूरक असलेल्या व हिंदू समाजाच्या श्रद्धेच्या विषय असल्याकरणास्त्व संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्तीकानंसाठी सिंधू-रत्न योजनेतून जिल्ह्यातील मूर्तिकारांना शाडू माती खरेदी साठी अनुदान उपलब्ध करून देण्या यावे व त्याबाबतच्या अनुदान वाटपाच्या निकष आपल्या स्तरावर ठरवण्यात यावेत असे आदेश सिंधू-रत्न योजनेचे सदस्य या नात्याने दिल्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्तीकारांच्या महत्वाचा प्रश्न चुटकीसरशी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी सोडवल्यामुळे मुर्तीकारांमध्ये आनंदाचे वातावरण असून मूर्तीकार संघाच्या वतीने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांचे आभार मानण्यात आले.