रत्नागिरी जिल्ह्यात २४ हजार ९३२ लखपती दीदींची नोंदणी.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उ:ेदचे काम रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्याला लखपती दिदी तयार करण्याच्या दिलेल्या उद्दिष्टांपैकी ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी महिना अखेरीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात २४ हजार ९३२ महिला लखपती दिदी ठरल्या आहेत. तर या सर्व दितींना १ हजार ५९ सीआरपी मदत करत आहेत. लवकरच आपल्या जिल्ह्यातील लखपती दिदींचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी व्यक्त केला आहे.www.konkantoday.com