![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/02/download-6.jpeg)
रत्नागिरी एसटी कार्यशाळेत १९८ विविध तंत्रज्ञांची पदे रिक्त.
राज्य परिवहन विभागामार्फत जिल्ह्यात ६३० बस प्रवाशांच्या दिमतीला धावत असतात. पण या बसच्या देखभाल दुरूस्तीचा गाडा सांभाळणार्या या विभागाच्या कार्यशाळेमधील ३३९ पदांपैकी १९८ विविध तंत्रज्ञांच्या रिक्त पदांमुळे आयटीआय ऍप्रेंटीसच्या १२० उमेदवारांच्या साथीने भार पेलून नेला जात आहे.
जिल्ह्यात रत्नागिरी बसस्थानकासह, माळनाका येथील विभागीय कार्यालय, मुख्य कार्यशाळा, टीआरपीसह माळनाका येथील कर्मचारी वसाहत, विश्रामगृह यांचीही दुरूस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरीचा एसटी परिवहन विभाग लवकरच नव्याने कात टाकणार आहे. त्यासाठी एमआयडीसीकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.www.konkantoday.com