ये कैसी डुबकी है., पंतप्रधान मोदींची गंगेत डुबकी अन् सोशल मीडियावर उधाण
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर आज (5 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं.पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी यांनी स्नानावेळची परिधान केलेला पोषाख वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी ठरला. पण स्नानावेळी पंतप्रधान मोदींनी घेतलेली डुबकी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. इतकंच नव्हेतर गंगेत डुबकी घेतानाच्या मोदींच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरऱ्यांनी कमेंट्स करत त्यांना ट्रोल केलं आहे.माघ अष्टमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलं. भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्ष माळ घालून मोदींनी संगमात डुबकी मारली. यावेळी त्यांनी काही मंत्रांचा जपसुद्धा केला. त्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगेत डुबकी मारताना आणि जप म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यावरून नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल केलं आहे. ये कैसी डुबकी है?… जिसमे सिर पानी के ऊपर है? असं म्हणत मोदींना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.