
जैन समाजाचे बोर्डवे येथे संमेलन
*कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील जैन मंदिरात २१ एप्रिलला सकाळी नऊ वाजता २४ वे स्नेहसंमेलन आणि भगवान महावीर जन्म कल्याण सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेंद्र ढणाल, प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रा. सोमनाथ कदम हे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने सकाळी नऊ वाजता महावीर जन्म कल्याण सोहळा, त्यानंतर समाजाचे स्नेहसंमेलन दुपारी दोन वाजल्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धा, प्लास्टिक कचऱ्यापासून कलात्मक वस्तू तयार करण्याच्या स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवारचे अध्यक्ष डॉ. दीपक तुपकर, सिंधुदुर्ग जिल्हा जैन महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपिका बिजितकर यांनी केले आहे. www.konkantoday.com