
गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवाची सांगता
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेशोत्सवाचे आयोजन 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने करण्यात आले होते.या माघी गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमीला महाप्रसादाने करण्यात आली. या महाप्रसादाचा लाभ सुमारे 3200 भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने देण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते