खेड शहरात एका तासात २२ अल्पवयीन दुचाकीस्वारांना दणका.
खेड शहरात बेदरकारपणे वाहने चालवणार्या वाहनचालकांसह अल्पवयीन दुचारीस्वारांविरोधात येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर ऍक्शन मोडवर आले आहेत. सोमवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत भर बाजारपेठेत राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान एका तासात २२ अल्पवयीन दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला. त्यांच्याकडून ३९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनल्याने बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहीम सुरूच आहे. या पाठोपाठच विनापरवाना दुचाकी चालवणार्यांसह अल्पवयीन दुचाकीस्वारांवरही धडक कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.
भर बाजारपेठेत केलेल्या कारवाईत २२ अल्पवयीन दुचाकीस्वार कचाट्यात अडकले आहेत.www.konkantoday.com