कडवई तांबडवाडी संगमेश्वर रत्नागिरी येथे माघी गणेश जयंती उत्सव श्री गजानन जांगल देव समिती मार्फत संपन्न,आकाश दिपक पाले याचा सत्कार
शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी मुक्काम कडवई तांबडवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे माघी गणेश जयंती उत्सव श्री गजानन जांगल देव समिती मार्फत संपन्न झाला. सदर प्रसंगी कुमार आकाश दिपक पाले या नवोदित होतकरू युवकाचा सन्मान करण्यात आला. आकाशने रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत (19 वर्षाखालील) प्रथम क्रमांक पटकावला तसेच विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून कडवई ग्रामस्थच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला. त्याला भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवई मधील क्रीडा शिक्षक श्री संतोष साळुंखे सरांचे मार्गदर्शन लाभले. त्याचा सत्कार पोलीस निरीक्षक श्री अमित यादव व पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत कांबळे संगमेश्वर यांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देवून करण्यात आला. सोबत त्याच्या आईवडिलांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर ग्रामस्थ मंडळ व मुंबई अध्यक्ष श्री सुरेश जोशी व नरेंद्र पाले., जितेंद्र चव्हाण (मनसे) श्री नंदू फडकले. मंडळाचे सल्लागार श्री प्रकाश नवले, शशिकांत जोशी, बाळकृष्ण गोटेकर, रामचंद्र जोशी, रमेश नवेले उपस्थित होते.
माघी जन्मोउत्सवात आमदार श्री शेखर निकम, माजी आमदार श्री सदानंद चव्हाण, माजी जिल्हापरिषद सदस्य श्री संतोष थेरडे माजी पंचायत समिती सदस्य श्री कृषणा हेरकर , कडवईचे माजी सरपंच श्री वसंत उजगावकर यांनी उपस्थिती दर्शविली. मंडळाच्या 23 व्या उत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री शिवराम धामनाक यांनी केले.